अखेर ठाकरेंचा युतीचा मुहूर्त ठरला, उद्या दुपारी १२ वाजता
अखेर ठाकरे सेनेचा व मनसेचा युतीचा मुहूर्त ठरला असून, उद्या दुपारी वरळीतल्या हॉटेल ब्लू सी या हॉटेल मद्ये पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू युतीची ऑफिसिएल घोषणा करणार आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून महायुतीच्या नेत्यांनी आत्तापासूनच ठाकरे सेनेला टार्गेट करायला सुरुवात केली आहे, यावर दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते उत्साहित असून उद्या दुपारी बारा वाजताची प्रतीक्षा सर्वाना लागली आहे, यावर संजय राऊतांनी ४ शब्दांचे ट्विट केले आहे "उद्या दुपारी १२ वाजता " असे ट्विट करून संजय राऊतांनी विरोधकांचे टेन्शन वाढवल्याचे दिसत आहेत, दुसरीकडे शरद पवार यांनीदेखील या युतीसाठी समर्थन दाखवले असून आता सिल्वर ओक बंगल्यावर बैठक सत्र सुरु झाले आहेत, "महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली", "महाराष्ट्राला अपेक्षित अश्या घोषणा होतील" अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहेअखेर ठाकरेंचा युतीचा मुहूर्त ठरला, उद्या दुपारी १२ वाजता