बुलढाण्यात शिवशाही बस–दुचाकी अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू
बुलढाणा – छत्रपती संभाजी नगर ते बुलढाणा मार्गावरील धाड गावाजवळ शुक्रवारी (5 जानेवारी 2026) रात्री झाली, शिवशाही बस आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवर चाललेल्या तीन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहिती नुसार, शिवशाही बस चालवताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकीवर असलेल्या तिघांपैकी कोणत्याही जणाला बचावासाठी वेळ मिळाला नाही आणि ते सर्व जागीच ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तातडीने मदत केली आणि पोलिस तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेतील मृतकांचे नाव
कैलास दांडगे,
रवी चंदनशिव,
अंकुश पाडळे अशी आहेत . सर्व तरुण वय वर्ष 20 च्या आत होते. अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक थांबलेली होती आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, पोलिस घटनास्थळाचे तपास करत आहेत आणि अपघाताची कारणे उघड करत आहेत. या घटनेनंतर स्थानिक समुदायात दु:खाचे वातावरण पसरले असून, रस्ते सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.बुलढाण्यात भीषण रस्ते अपघात – शिवशाही बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू