संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टाकडून आरोप निच्छित
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी अटक झालेल्या वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी याना बीडच्या न्यायालयात आज हजार करण्यात आले होते, या प्रकरणातील हि २३ वि सुनावणी होती, यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा कोर्टात बोलल्याचे सांगितले जात आहे, कोर्टात न्यायाधीशाने आरोप मान्य असल्याचे विचारले असताना, "हे आरोप आम्हाला मान्य नाही" अशी प्रतिक्रिया वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्याने दिली आहे, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी वाल्मिक कराड याना भेटणाऱ्या खंडणी वर निर्बंध लावल्या कारणाने वाल्मिक कराड व त्याच्या टोळक्याने संतोष देशमुख यांची हत्या केली असा आरोप न्यायालयाने निच्छित केला असून त्याबद्दलची पुढील सुनवाई 9 जानेवारी ला होणार आहे, यावेळी वकील उज्ज्वल निकम बोलत असताना त्यांनी आरोपींच्या d for delay operation ला लगाम दिला अस वक्तव्य त्यांनी केले, कोर्टाने आरोप निच्छित करताच धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली असून आरोपीना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे मात्र आता ९ जानेवारी ला खटला कोणते वळण घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टाकडून आरोप निच्छित